Mumbai”s Potholes *Entered in Guinness and Limca Book of Records with the great support of all Mumbaikars’

Mr. Rajesh Soni, single-handedly developed this website MumbaiPotholes.com for the mission and for the love of Mumbaikars.

World Record India has asked for complete details of potholes in Mumbai, details of demand are given below
Every Mumbaikars such as doctors, engineers, advocate, businessmen, shopkeepers, service men, students and also Social NGO Supported the Mission, names of some of the social Organisations who supported…
1. P S Foundation
2. Priyadarshani Foundation
3. Prakashwadi Kamabugh CHS
4. Mahyavanshi Samaj
5. Rising Star
6. Rickshaw Union Andheri (Chakala, Garware, Sahar Road, Andheri and Airport)

Social workers Shri Mushtaq Ansari and Shri Irfan Machiwala also complimented the mission.

From the day the mission started for potholes in Mumbai, every Mumbaikars started uploading the Photographs and Videos to the given email address and mobile number to Shri Navin Lade, General Secretary – Employment RPI (A), Maharashtra State , to register in Guinness book of world Records!

Above this, India’s biggest Records books member Shri Paavan (World Record India) also asked to send the details on their website (Website https://www.worldrecordsindia.com/tag/maharastra/) on July 24, 2018. At 1.15 pm. Navin Lade applied for the same on 24 July 2018, at 2.00 pm on behalf of MumbaiKar.

After studying the importance of Navin Lade’s Mission, Shri Rajesh Soni developed the website MumbaiPotholes.com on his own for Mumbaikars. He has developed a very way on the website to upload Photos and Videos in entire Mumbai area in easy way with all the details i.e. cell numbers address place of Potholes etc.

The details of photographs and videos and all the data will be given to Guinness World Records, Limca book of World and India, and then after Paying US$ 850 to Guinness book and also after the Verification , the Certificate issued by them will be collected in the name of honorable Municipal Commissioner (MCGM).

“खड्डेमुक्त” मुंबई अभियाना सहित मुंबईतील खड्डे गिनीज व लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी करण्याच्या अभियानाला “मुंबईकरांचा” उत्स्फुर्त प्रतिसाद!मुंबईतील वेबडिझायनर राजेश सोनी यांच्यामार्फत या मोहिमेसाठी potholes.com या मोफत वेबसाईटचे लोकार्पण

“वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया” ने देखील मुंबईतील खड्यांची मागविली माहिती

मागणीनुसार प्रस्ताव सादर `
फोटो-व्हिडीओ पाठवणाऱ्यांमध्ये डॉक्टर,वकील,इंजिनियर, व्यापारी,उद्योजक ,नोकरदार,विध्यार्थी यांच्यासहित पी.एस.फाउंडेशन,माह्यावंशी समाज,प्रियदर्शनी संस्था,प्रकाशवाडी कामाबाग स.गृ.संस्था,राईझींग स्टार, महिला बचत गट व रिक्षा युनियन गरवारे -चकाला- सहार कार्गो ,अंधेरी आदी सामाजिक संघटनांचा व युनियनचा समावेश

समाजसेवक मुस्ताक अन्सारी व इरफान मच्छीवाला यांच्यातर्फे अभियानाला शुभेच्छा

मुंबई महानगर पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे प्रत्येक रस्त्याला पडलेल्या खड्डयांची “गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड” व “लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंद करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक खड्याचे छायाचित्र व व्हिडीओ पाठविण्याचे आवाहन रिपाई (ए)रोजगार आघाडी महाराष्ट्र सरचिटणीस नवीन रा.लादे यांनी केल्यापासून या अभियानाला “मुंबईकरांचा” उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
इतकेच नव्हे तर भारतातील सर्वात अग्रगण्य रेकॉर्ड बुक असलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे सदस्य असलेल्या पावन यांनी आपल्या वेबसाईटवर(Website https://www.worldrecordsindia.com/tag/maharastra/)व्हिझीट मेसेंजर पाठवून रेकॉर्डसाठी अर्ज व प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन दिनांक २४ जुलै २०१८ रोजी १.१५ वाजता केले.यानुसार नवीन लादे यांनी दिनांक २४ जुलै रोजी २.०० वाजता त्वरित अर्ज व प्रस्ताव सादर केला
तर नवीन लादे यांच्या या मोहिमेचे महत्व लक्षात घेवून मुंबईतील वेबडिझायनर असलेल्या राजेश सोनी यांनी potholes.com ही वेबसाईट बनवून दिली आहे.या वेबसाईटवर मुंबईकरानी आपल्या परिसरातील रस्त्यांवरील खड्यांचे फोटो,व्हिडिओ आपले नाव,ठिकाण,रस्त्याचे नाव,मोबाईल नंबर, आदि माहिती भरून वेबसाईट वरील👌 अर्ज भरून पाठवायचे आहे.राजेश सोनी यांनी ही वेबसाईटवर फोटो व व्हिडिओ पाठविण्याची प्रक्रिया सोप्या व मुंबईकरांनी जास्तीत जास्त खड्ड्यांचे फोटो-व्हिडीओ पाठवावेत यासाठी बनवली आहे.या वेबसाईटची लिंक संगणकावर क्लिक करून अगोदर काढलेले तर आपल्या स्मार्ट फोन वरून अर्जातील कॅमेरा बटन क्लिक करूनही मुंबईकर फोटो व व्हिडिओ पाठवू शकणार आहेत.
मुंबईकरांकडून पाठविण्यात येणारी खड्ड्यांची माहिती या वेबसाईटवर दिसणार असून मुंबईकरांकडून जमा होणार असलेला हा सर्व डाटा “गिनीज,लिम्का बुक ऑफ व वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया”कडे सादर करण्यात आल्यानंतर व गिनिज बुककडे काही डॉलर भरल्यानंतर गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड कडून व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे प्रमाणपत्र दिले जाणार आहे ते मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या नावे घेतले जाणार आहे.
दरम्यान मुंबईकरांची
खड्यांपासुन मुक्तता करण्यासाठी नवीन लादे यांच्या प्रमाणेच कार्यरत असलेल्या परंतु नवीन लादे यांनी अवलंबलेल्या मार्गापेक्षा खड्डे स्वहस्ते बुजवण्याची मोहीम राबविणाऱ्या माहिम,मुंबई येथील समाजसेवक मुस्ताक अन्सारी व इरफान मच्छीवाला यांनी नवीन लादे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट देऊन नवीन लादे यांचे कौतुक करण्याबरोबरच नवीन लादे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या